Pashusavardhan Vibhag Recruitment 2023 : पशुसंवर्धन विभाग पुणे अंतर्गत “पशुधन पर्यवेक्षक वरिष्ठ लिपिक, लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निन्मश्रेणी), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तारतंत्री, तांत्रिकी आणि बाष्पक परिचर” पदाच्या ४४६ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज पद्धती ही ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जून 2023 आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिशियल वेबसाईट, भरती बद्दलच्या महत्त्वाच्या तारखा, आणि इतर सर्व गोष्टी लक्षात घेऊन अर्ज करावा
आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल तुम्ही आमच्या वेबसाईटवर आला त्याबद्दल धन्यवाद

Pashusavardhan Vibhag Recruitment 2023 : संपूर्ण माहिती
पदाचे नाव | पशुधन पर्यवेक्षक वरिष्ठ लिपिक, लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निन्मश्रेणी), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तारतंत्री, तांत्रिकी आणि बाष्पक परिचर |
पदसंख्या | ४४६ पदे |
शैक्षणिक पात्रता | शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया मूळ जाहिरात वाचा) |
नोकरीचे ठिकाण | पुणे |
वयोमर्यादा | इतर उमेदवारांसाठी – १८ ते ३८ वर्ष मागासवर्गीय उमेदवार – १८ ते ४३ वर्ष |
परीक्षा शुल्क | अमागास – १०००/- मागासवर्गीय/अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक/ – ९००/- परीक्षा शुल्क परत दिले जाणार नाही (Non-Refundable) |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | ११ जून २०२३ |
अधिकृत वेबसाईट | www.ahd.maharashtra.gov.in |
Pashusavardhan Vibhag Recruitment 2023 Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
पशुधन पर्यवेक्षक | ३७६ पदे |
वरिष्ठ लिपिक | ४४ पदे |
लघुलेखक (उच्चश्रेणी) | ०२ पदे |
लघुलेखक (निन्मश्रेणी) | १३ पदे |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | ०४ पदे |
तारतंत्री | ०३ पदे |
तांत्रिकी | ०२ पदे |
बाष्पक परिचर | ०२ पदे |
How To Apply For Pashusavardhan Vibhag Recruitment 2023 : असा करा अर्ज
- या भरती करिता अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवाराने नोंद घ्यावी
- उमेदवाराने आवश्यक कागदपत्रांची प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे
- उमेदवाराने अर्जामध्ये संपूर्ण माहिती भरणे आवश्यक आहे
- अपूर्ण माहिती असलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
- अर्ज करण्यासाठीच्या सूचना भरतीच्या ऑफिसिअल संकेतस्थळावर उपलब्ध आहेत
- अर्ज शुल्काशिवाय अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जून २०२३ आहे
- उशिरा आलेले अर्ज सरसकट नाकारले जातील.
- अधिक माहिती करीता कृपया PDF जाहिरात वाचावी
Educational Qualification For Pashusavardhan Vibhag Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | पद संख्या |
पशुधन पर्यवेक्षक | १) उमेदवार माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण झालेला असावा आणि पशुसंवर्धन आयुक्तालयाने चालविलेला किंवा महाराष्ट्र राज्यातील सांविधानिक कृषि विद्यापीठाने चालविलेला किंवा महाराष्ट्र राज्यातील समतुल्य विद्यापीठाने चालविलेला पशुधन पर्यवेक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा, किंवा २) महाराष्ट्र राज्याच्या तंत्रशिक्षण परिक्षा मंडळामार्फत किंवा महाराष्ट्र राज्यातील सांविधानिक कृषि विद्यापीठाने किंवा महाराष्ट्र राज्यातील समतुल्य विद्यापीठाने चालविलेला दोन वर्षाचा दुग्धव्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा, किंवा ३) महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांच्यामार्फत चालविण्यात येणारा दोन वर्षाचा पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा, किंवा ४) महाराष्ट्र राज्यातील सांविधानिक कृषि विद्यापीठाची किंवा त्यास समतुल्य | विद्यापीठाची बी. व्ही. एस. सी. किंवा बी. व्ही. एस. सी. अँड ॲनिमल हजबंड्री ही पदवी धारण केलेली असावी. |
वरिष्ठ लिपिक | सांविधिक विद्यापीठाची पदवी. |
लघुलेखक (उच्चश्रेणी) | माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र लघुलेखनाचा स्पीड कमीत कमी १२० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा स्पीड कमीत कमी ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा स्पीड कमीत कमी ३० शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र. |
लघुलेखक (निन्मश्रेणी) | माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र असावे लघुलेखनाचा स्पीड कमीत कमी १०० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा स्पीड कमीत कमी ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा स्पीड कमीत कमी ३० शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र असावे. |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र किंवा सुक्ष्मजीवशास्त्र मुख्य विषयासह विज्ञानाची पदवीधारक आणि महाराष्ट्र राज्यातील सांविधिक विद्यापीठाव्दारे किंवा हाफकाईन बायो- फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लि. मुंबई यांचे व्दारे आयोजीत प्रयोगशाळा वैद्यकिय तंत्रज्ञानाचा डिप्लोमा धारक असावा. |
तारतंत्री | १) औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा इतर मान्यताप्राप्त संस्थेचे तारतंत्री ट्रेडचे प्रमाणपत्र २) विद्युत उपकरणांचा देखभाल व दुरूस्तीचा १ वर्षाचा अनुभव |
तांत्रिकी | १) माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असावी २) कुठल्याही औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे डिझेल मॅकॅनिक ट्रेडचे प्रमाणपत्र असावे ३) यांत्रिकी पदावर काम करण्याचा यंत्र देखभाल व दुरूस्तीचा कमीत कमी २ वर्षाचा अनुभव. |
बाष्पक परिचर | 1) माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असावी 2) महाराष्ट्र बाष्पके आणि धुराचा उपद्रव संस्थेचे (Institute of Boilers and Smoke Nuisance of Maharashtra State) अथवा इतर मान्यताप्राप्त संस्थेचे व्दितीय श्रेणीचे प्रमाणपत्र बाष्पक 3) बाष्पक परिचर नियम, २०११ च्या नियम ४१ अंतर्गत निर्दिष्ट केल्यानुसार ब किंवा क प्रमाणपत्र धारक असावा 4) उमेदवार नोंदी ठेवण्यास आणि तापमानाची नोंद घेण्यास सक्षम असला पाहिजे |
Pashusavardhan Vibhag Recruitment 2023 Vacancy Details
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
पशुधन पर्यवेक्षक | २५,००० ते ८१,१०० रुपये प्रति महिना |
वरिष्ठ लिपिक | २५,००० ते ८१,१०० रुपये प्रति महिना |
लघुलेखक (उच्चश्रेणी) | ४१,८०० ते १,३२,३०० रुपये प्रति महिना |
लघुलेखक (निन्मश्रेणी) | ३८,६०० ते १,२२,८०० रुपये प्रति महिना |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | ३५,४०० ते १,१२,४०० रुपये प्रति महिना |
तारतंत्री | १९,९०० ते ६३,२०० रुपये प्रति महिना |
तांत्रिकी | १९,९०० ते ६३,२०० रुपये प्रति महिना |
बाष्पक परिचर | १९,९०० ते ६३,२०० रुपये प्रति महिना |
Selection Process For Pashusavardhan Vibhag Recruitment 2023
१. सर्व पदांसाठी फक्त मराठी माध्यमातुन संगणक प्रणालीवदारे ऑनलाइन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपयायी स्वरुपात घेण्यात येइल. परीक्षा राज्यातील जिल्ह्याच्या मुख्यालयी घेण्यात येइल.
- संगणक आधारीत परीक्षेद्वारे (Computer Based online examination) घेण्यात येणाऱ्या ऑनलाइन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने किमान 45 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
- संगणक अधारीत परीक्षेद्वारे (Computer Based online examination) घेण्यात येणाऱ्या ऑनलाइन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपयायी स्वरूपात असेल व प्रत्येक प्रश्नास 2 गुण असतील.
- ज्या पदांसाठी शारीरिक व व्यावसावयक चाचणी आवश्यक नाही अशा पदांकरिता उमेदवारांची निवड करताना संगणक अधारीत (Computer Based examination) घेण्यात येणारी ऑनलाइन परीक्षा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांकरिता प्रत्येकी 50 गुण ठेवुन एकुण 200 गुणांची असेल. परीक्षा कालावधी दोन
तासांचा राहील. - ज्या पदांसाठी शारीरिक व व्यावसायिक चाचणी आवश्यक आहे अशा पदाकरीता उमेदवाराची निवड करताना संगणक आधारीत (Computer Based examination) घेण्यात येणारी ऑनलाइन परीक्षा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांकरिता प्रत्येकी 30 गुण ठेवुन एकुण 120 गुणांची असेल. तसेच शारीरिक चाचणी /व्यावसावयक चाचणी 80 गुणांची राहील, त्यासाठी दोन तासाचा कालावधी राहील.
- संगणक आधारीत ऑनलाइन परीक्षेसाठी अभ्यासक्रम खालीलप्रमाणे राहील:

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याच्या सविस्तर सूचना
- उपरोक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज https://ibpsonline.ibps.in/cahmay23/ या संकेतस्थळावर मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांना विभागाच्या संकेतस्थळावर दिनांक 27.05.2023 ते दिनांक 11.06.2023 या कालावधीमध्ये वेब बेस्ड (Web-Based) ऑनलाइन आवेदन पत्र सादर करणे आवश्यक राहील. तसेच ऑनलाइन परीक्षा शुल्क भरणा दिनांक 27.05.2023 ते दिनांक 11.06.2023 या कालावधीमध्ये करता येइल.
- विहित पद्धतीने मुदतीत म्हणजेच दिनांक 11.06.2023 पर्यंत अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी शुल्क भरण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने रक्कम भरण्याची कार्यवाही दिनांक 11.06.2023 रोजी रात्री 23.59 वाजेपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यानंतर सदर वेब लिंक बंद होईल.
- परीक्षा स्थगित व रद्द करणे, परीक्षेचे स्वरूप, परीक्षेची तारीख व ठिकाण बदल करणे, पदसंख्या वाढ किंवा घट करण्याचे अधिकार विभागास राहतील व विभागाचा निर्णय अंतिम असेल, त्याबाबत कोणताही दावा सांगता येणार नाही. तसेच भरती प्रक्रिये संदर्भात वा तक्रारी बाबत निर्णय घेण्याचा अधिकार विभागास राहील व विभागाचा निर्णय अंतिम असेल. याबाबत कोणत्याही पत्र व्यवहाराची दखल घेतली जाणार नाही.
- उमेदवाराचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने अर्ज करताना अर्हते बाबतची प्रमाणपत्रेजोडणे आवश्यक नाही. ऑनलाइन अर्जामध्ये उमेदवाराने त्याच्या पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण व खरी माहिती भरणे आवश्यक आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरताना काही चुका झाल्यास किंवा त्रुटी राहिल्यास व भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्ज नाकारला गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. याबाबत उमेदवारास तक्रार करता येणार नाही. ऑनलाइन अर्जात भरलेली माहिती बदलता येणार नाही. जाहिरातीत नमूद केलेल्या सर्व अटी व पात्रता तपासूनच उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरावा.
- उमेदवारांची परीक्षा ही त्यांनी ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या गृहीत पात्रतेनुसार कोणतीही कागदपत्रे पूर्व तपासणी न करता घेतली जाणार असल्यामुळे या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवाराला निवडीबाबतचे कोणतेही हक्क राहणार नाहीत. कागदपत्रांच्या पूर्ण छाननी नंतरच उमेदवाराची पात्रता निश्चित करण्यात येईल उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेतील मिळालेल्या गुणांच्या आधारे तसेच त्यांनी ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या गृहीत पात्रतेनुसार अंतरिम यादी प्रसिद्ध करून उमेदवारांच्या कागदपत्रांची सखोल छाननी केली जाईल. सदर प्रक्रियेत उमेदवार अपात्र आढळल्यास त्यास निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येईल आणि पात्रता धारण न करणाऱ्या उमेदवारांना भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र करण्याचे सर्व अधिकार आयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र राज्य यांनी राखून ठेवले आहेत
- परीक्षेच्या वेळी परीक्षा केंद्रात किंवा परीक्षा केंद्र परिसरात मोबाईल, कॅल्क्युलेटर, आयपॅड आणि इलेक्ट्रॉनिक यंत्र किंवा इतर संपर्काची साधने वापरण्यास सक्त मनाई आहे
- उमेदवारास परीक्षा/कागदपत्र पडताळणी इत्यादी करिता स्वखर्चाने यावे लागेल
- ऑनलाईन परीक्षा स्थळांमध्ये बदल करण्याचे अधिकार विभागाकडे आहेत परीक्षेचे ठिकाण, वेळ, दिनांक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील
- परीक्षेचे प्रवेश पत्र वर नमूद केलेल्या संकेतस्थळावरूनच स्वतः डाऊनलोड करून घेण्याची जबाबदारी सर्व श्री उमेदवाराची असेल परीक्षा पत्र इतर कोणत्याही पद्धतीने पाठवले जाणार नाही
- पात्र उमेदवारांचा अंतिम निकाल विभागाच्या https://ahd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल
Important Links For Pashusavardhan Vibhag Recruitment 2023
PDF जाहिरात पहा | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करा | अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा |
आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)
नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील
आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा — Join Here —
व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.
Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
Nashik Rojgar Melava 2023 | 10 वी, ITI आणि पदवीधरांसाठी नाशिक येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन