Join Whatsapp Group

Join Telegram Group

Talathi Bharti 2023 : Online Form Date | Questions Papers। How To Apply Online

Talathi Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य तलाठी भरती 2023 मध्ये रिकाम्या असलेल्या ४१२२ पदांसाठी अर्ज सुरु होणार आहेत, अर्ज पद्धती हि ऑनलाईन पद्धतीने होणार असून इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून खाली दिलेली अर्जाबद्दल ची संपूर्ण माहिती , अर्ज करण्याची ऑफिसिअल वेबसाईट, जाहिरात, महत्वाच्या तारखा लक्षात घेऊन अर्ज जमा करावा. अश्याच प्रकारच्या विविध भरती आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुमच्या पर्यंत पोहचवत असतो त्यामुळे आमच्या वेबसाईट ला subscribe करा आणि आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा

Talathi Bharti 2023

Maharastra Talathi Bharti २०२३

महाराष्ट्र राज्य सरकारकडून 4122 पदांसाठी तलाठी भरती जाहीर करण्यात आलेली असून मात्र अजूनही हि प्रक्रिया सुरु झालेली नाही तरी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हि प्रक्रिया एप्रिल महिन्या मध्ये सुरु होऊ शकते मार्च महिन्या मध्ये झालेल्या महसूल परिषदेत बोलताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तलाठी भरती २०२३ प्रक्रिये संदर्भात महत्वाची घोषणा केली होती त्यांच्या म्हणण्यानुसार भरती ची प्रक्रिया हि १५ मार्च पासून सुरु होणार होती परंतु अद्याप हि प्रक्रिया सुरु झालेली नाही.

लोणी येथे झालेल्या या परिषदेमध्ये राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांनीही उपस्थिती लावली होती सूत्रांच्या माहितीनुसार Maharastra Talathi Bharti २०२३ ही ऑगस्ट महिन्यापर्यंत पूर्ण होणार आहे संदर्भातील जाहिरात मार्च महिन्यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आता तयारीला लागायला हवी अर्ज करण्यापूर्वी लागणारी आवश्यक माहिती आमच्या वेबसाईटवर दिलेली आहे ती तुम्ही काळजीपूर्वक जाणून घ्या.

How To Apply For Talathi Bharti 2023 – अर्ज कसा करावा ?

Talathi Bharti २०२३ साठी खाली दिलेल्या पद्धतीने अर्ज भरावा

 • अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने भरण्यात येणार आहे त्यामुळे अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यावी लागेल — Official Website — साठी येथे क्लिक करा.
 • अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे स्वतःचे Gmail अकाउंट असणे आवश्यक आहे.
 • वेबसाईट वर दिलेल्या सर्व प्रकारची माहिती भरल्यानंतर सबमिट बटन वर क्लिक करून अर्ज जमा करावयाचा आहे.
 • सबमिट बटन वर क्लिक केल्यानंतर अर्जाची प्रत ही आपल्या जीमेल अकाउंट वर आपल्याला प्राप्त होईल.
 • आपल्याला प्राप्त झालेल्या अर्जाच्या प्रतीची प्रिंट काढून घ्यावी आणि मुलाखतीच्या दिवशी हे प्रिंट आपल्या सोबत असणे आवश्यक आहे.

Talathi Bharti 2023 Important Information

संस्थेचे नावमहाराष्ट्र महसूल आणि वन विभाग
पदाचे नावतलाठी मंडळ अधिकारी भरती
एकूण पदेचार हजार एकशे बावीस (4122)
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
शैक्षणिक पात्रताकोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठामध्ये पदवीधर असावा
त्याचबरोबर मराठी आणि हिंदी भाषेचे ज्ञान असावे
वयोमर्यादाओपन कॅटेगिरी साठी 18 ते 38 वर्ष
इतर कॅटेगरी साठी 18 ते 43 वर्ष
वेतन५२००/- ते 20200/- पर्यंत
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन पद्धतीने अर्ज होतील
अर्ज करण्यासाठी लागणारी फीजओपन कॅटेगिरी साठी – ५००/-
इतर कॅटेगरीसाठी – ३५०/-
अर्ज करण्याची शेवटची तारीखलवकरच उपलब्ध होईल
अधिकृत वेबसाईटhttps://rfd.maharashtra.gov.in/

Talathi Bharti २०२३ Required Documents – अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

 • उमेदवाराकडे आपला स्वतःचा Resume म्हणजेच बायोडाटा असणे आवश्यक आहे.
 • दहावी बारावी आणि पदवीच्या शिक्षणाची शैक्षणिक प्रमाणपत्रे.
 • School Leaving Certificate – शाळा सोडल्याचा दाखला
 • Cast Certificate – जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
 • पासपोर्ट साईज फोटोग्राफ
 • ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स)
 • Domicile Certificate – (आदिवासी प्रमाणपत्र)
 • Nationality Certificate – (राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र)
 • Non-Creamy Layer Certificate – (नॉनक्रिमिलियर सर्टिफिकेट)
 • महिला आरक्षण प्रमाणपत्र (फक्त महिलांसाठी)
 • प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र
 • Sports Certificate (खेळाडू प्रमाणपत्र)
 • Disability Certificate (अपंगत्व प्रमाणपत्र)

Talathi Bharti २०२३ Exam Pattern – असे असणार परीक्षेचे स्वरूप

विषय (Subject)प्रश्नांची संख्या (Questions)Marks (गुण)
मराठी२५५०
इंग्रजी२५५०
सामान्य ज्ञान२५५०
बौद्धिक चाचणी२५५०
एकूण १००२००

Talathi Bharti २०२३ Syllabus – तलाठी भरती अभ्यासक्रम

महाराष्ट्र तलाठी भरती २०२३ चा संपूर्ण अभ्यास क्रम खाली दिलेला आहे तो तुम्ही संपूर्ण पाहून घ्या

विषयतपशील
मराठीमराठी व्याकरण ( समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, समास, वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग इत्यादी)
म्हणी व वाक्यप्रचार, प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक
वाक्यात उपयोग आणि शब्द संग्रह
इंग्लिश१) English Grammer (Synonyms , Antonyms, Punctuation, Spellings, Tense, Voice, Narrations, Article)
२) Fill In the blanks in the sentence
3) Simple Sentence Structure (Error, Types of sentence)
4) Vocabulary (Use of idioms and phrases and their meaning)
सामान्य ज्ञान चालू घडामोडी , भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान, इतिहास, भूगोल, माहिती व तंत्रज्ञान, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 , जनरल टॉपिक
बौद्धिक चाचणी अंकगणित बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काळ काम वेग संबंधित उदाहरणे, सरासरी, नफा तोटा, सरळवाढ व्याज व चक्रवाढ व्याज चलन
बुद्धिमत्ता ( कमालिका व अक्षरमालिका, वेगळा शब्द आणि अंक ओळखणे, अक्षर , आवृत्ती, वाक्यावरून निष्कर्ष, वेन आकृती इत्यादी )

Talathi Bharti Previous Year Question Papers – मागील वर्षातील प्रश्नपत्रीका

मित्रांनो तुम्ही मागील वर्षातील तलाठी भरती साठी चे Questions पेपर शोधत असाल तर ते आमच्या वेबसाईटवर PDF फॉरमॅटमध्ये अवेलेबल आहेत तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून सगळे Questions पेपर्स डाऊनलोड करून तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह करू शकता

परीक्षेचे नाव (Exam Name)प्रश्नपत्रिका ( उत्तरसहित )
Talathi Bharti Previous Year Question Paper
(Exam Date ०२/०७/२०१९) Shift १
Download Paper
Talathi Bharti Previous Year Question Paper
(Exam Date ०२/०७/२०१९) Shift २
Download Paper
Talathi Bharti Previous Year Question Paper
(Exam Date ०४/०७/२०१९) Shift १
Download Paper
Talathi Bharti Previous Year Question Paper
(Exam Date ०४/०७/२०१९) Shift २
Download Paper
Talathi Bharti Previous Year Question Paper
(Exam Date ०७/०७/२०१९)
Download Paper
Talathi Bharti Previous Year Question Paper
(Exam Date ०८/०७/२०१९)
Download Paper

Talathi Bharti २०२३ Vacancy – जिल्ह्यांनुसार रिक्त पदे

Division ( विभाग )Vacancy ( रिक्त जागा )
पुणे विभाग ७४६
नाशिक विभाग १०३५
औरंगाबाद विभाग ८४७
कोकण विभाग ७३१
नागपूर विभाग ५८०
अमरावती विभाग १८३
एकूण ४१२२

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा Join Here

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद

Frequently Asked Questions – FAQ

2023 तलाठी भरती कधी निघणार आहे?

तलाठी भरती २०२३ एप्रिल महिन्या मध्ये सुरु होणार असून भरतीची संपूर्ण प्रक्रिया ऑगस्ट पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे

तलाठी पगार किती असतो?

२०२३ मध्ये निघणाऱ्या भरतीसाठी ५२०० रुपये ते २०२०० रुपये असा वेतन दार ठरवण्यात आलेला आहे

तलाठी भरती साठी शिक्षण किती पाहीजे?

तलाठी भरती साठी शैक्षणिक पात्रता कमीत कमी पदवीधर असावी आणि हिंदी आणि मराठी भाषेचे ज्ञान असावे

तहसीलदार म्हणजे काय ?

तहसीलदार म्हणजे भारतीय महसूल अधिकारी

तलाठी भरती सुरु झाली का ?

१५ मार्च २०२३ पासून भरतीची प्रक्रिया सुरु होणार होती असं महसूल मंत्री राधाकृष्ण विषे पाटील यांनी सांगितले होते परंतु अद्याप हि प्रक्रिया सुरु झालेली नाही हि प्रक्रिया एप्रिल महिन्यामध्ये सुरु होऊ शकते

Read More

Pimpari Chinchwad Sahkari Bank Recruitment 2023 : How To Apply | असा करा अर्ज

Leave a Comment

संपर्क साधा