SSC MTS Exam Date : SSC MTS परीक्षेची तारीख जाहीर झालेली आहे हि परीक्षा स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) द्वारे विविध मंत्रालय विभाग आणि कार्यालयामध्ये सामान्य सेवा केंद्रीय गट – सी नॉन-राज्यपत्रित गैर मंत्रालयीन पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यासाठी आयोजित केलेली राष्ट्रीय स्तरीय परीक्षा आहे SSC MTS Exam २०२३ अधिसूचनेनुसार SSC MTS TIER -१ परीक्षा ०२ मे २०२३ ते १९ मे २०२३ आणि १३ जून २०२३ ते २० जून २०२३ या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे.

SSC MTS Exam 2023 Notification
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने MTS परीक्षेची अधिसूचना जाहीर केलेली आहे ज्यामध्ये SSC MTS हवालदार (CBIC आणि CBN) आणि मल्टी टास्किंग स्टाफ साठी १२५२३ रिक्त जागा जाहीर केलेल्या आहेत, स्टाफ सेलक्शन कमिशन द्वारे विविध पदांसाठी उमेदवारांची भरती करण्यासाठी हि परीक्षा आयोजित केली जाते यामध्ये हवालदार, शिपाई, दप्तर, जमादार, कनिष्ट गेस्टेटनर ऑपरेटर, चौकीदार, सफाई कामगार आणि माळी इत्यादी
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) दर वर्षी ३ वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये (MTS) मल्टी टास्किंग स्टाफ सिलेक्शन परीक्षा आयोजित करत असतात
- पेपर १ (ऑनलाईन)
- PET/PST (फक्त हवालदार पोस्ट साठी गरजेचे आहे)
या परीक्षेच्या दोन्ही टप्प्यामध्ये उमेदवाराने पात्रता प्राप्त आवश्यक आहे आणि SSC के द्वारा तयार केलेल्या गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवणे आवश्यक आहे SSC MTS परीक्षेचे तपशील (सूचना परीक्षेच्या तारखा, परीक्षेचा नमुना, अभ्यासक्रम, पगार-कट ऑफ, रिक्त जागा, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, आणि इतर तपशील) या बाबत उमेदवाराने संपूर्ण माहिती करून घ्यावी
How To Prepare For SSC MTS Exam 2023 : अशी करा परीक्षेची तयारी
Staff Selection Commision Preparation : केंद्र शासनाच्या विविध सेवांमध्ये गट कर्मचारी निवडण्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन (कर्मचारी निवड आयोग) ची स्थापना करण्यात आली भारतात सर्वात जास्त शासकीय रोजगार उपलब्ध करून देणारी शासकीय अशी स्टाफ सिलेक्शनची ओळख आहे. उत्तर प्रदेश बिहार राज्यातील लाखो उमेदवार या भरतीसाठी प्रयत्न करत असतात दुर्दैवाने या पदांबद्दल या भरतीबद्दल महाराष्ट्रात फारशी माहिती नसते
बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे केंद्र सरकारच्या विविध भागांमध्ये लॉर्ड डिव्हिजन क्लार्क, डेटा एन्ट्री ऑपरेटर ज्युनिअर असिस्टंट, पोस्टल सहाय्यक अशा एकूण 4500 पदांच्या भरतीसाठी कम्बाईन हायर सेकंडरी एक्झामिनेशन 2022 ही परीक्षा दोन टप्प्यांमध्ये घेण्यात येईल परीक्षेसाठी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि किमान वयोमर्यादा अठरा वर्ष व कमाल वयोमर्यादा 27 वर्षे आहे
SSC MTS Exam Pattern 2023 : परीक्षेचे स्वरूप
ही परीक्षा दोन स्तरीय आहे यामध्ये पहिला टप्पा संगणक आधारित चाचणी व दुसरा टप्पा कौशल्य चाचणी आहे
- एकत्रित उच्च माध्यमिक स्तर ही एक परीक्षा ही 200 गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ऑनलाइन स्वरूपाची असून या परीक्षेचा कालावधी 60 मिनिटांचा असेल या परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग आहे या परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान 25 प्रश्न, 50 गुण 2) इंग्रजी-25 प्रश्न, 50 गुण 3) सामान्य बुद्धिमापन-25 प्रश्न, 50 गुण 4)Quantitative Aptitude – 25 प्रश्न, 50 गुण अशाप्रकारे विषयनिहाय गुणविभाजन आहे ही परीक्षा ऑनलाईन घेण्यात येणार असून एक तासाची आहे प्रत्येक चुकीच्या उत्तराला 1/2 गुण वजा केले जातात या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दुसऱ्या टप्प्यात प्रवेश मिळतो
- स्तर 2 : स्तर एक उत्तीर्ण उमेदवार स्तर दोन परीक्षेत साठी पात्र असतो स्तर दोन्ही परीक्षा संगणक आधारित चाचणी स्वरूपाची असून दोन विभागात घेण्यात येते त्यातील पहिल्या विभागामध्ये गणित क्षमता, आकलन क्षमता, सामान्य बुद्धिमत्ता, संगणक ज्ञान या घटकांचा समावेश असतो तर दुसऱ्या विभागांमध्ये व्यावसायिक चाचणी घेण्यात येते
- लोअर डिव्हिजन क्लार्क या पदासाठी टायपिंग टेस्ट घेतली जाते ऑनलाइन अर्ज करण्यासाठी http://ssc.nic.in या वेबसाईटचा वापर करावा
- परीक्षा शुल्क रुपये – 100 रुपये परीक्षा फॉर्म भरण्याची फी असेल
- महाराष्ट्रातील परीक्षा केंद्र – अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, पुणे
केंद्र शासनाच्या सेवेत जाण्यासाठी स्टाफ सिलेक्शन हा उत्तम पर्याय आहे यासाठी योग्य साहित्याचा वापर दरवाजा नमुना सराव पत्रिकांचा अभ्यास, उपलब्ध वेळ याचे नियोजन करून किमान वेळेत साध्य करता येईल
SSC MTS Exam 2023 All Information : संपूर्ण माहिती
संस्थेचे नाव | स्टाफ सिलेक्शन कमिशन |
परीक्षेचे नाव | SSC MTS EXAM 2023 |
पदसंख्या | 15,523 जागा |
नोकरीचा प्रकार | सरकारी नोकरी |
परीक्षेचा प्रकार | राष्ट्रीय स्तरावर |
शैक्षणिक पात्रता | दहावी उत्तीर्ण |
वयोमर्यादा | 18 ते 25 वर्ष 18 ते 27 वर्ष |
परीक्षेची तारीख | 02 मे 2023 ते 19 मे 2023 13 जून 2023 ते 20 जून 2023 |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
परीक्षेची पद्धत | ऑनलाइन |
वेतनश्रेणी (पगार) | 18,000 रुपये ते 22,000 रुपये प्रति महिना |
निवड प्रक्रिया | निवड प्रक्रिया पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात वाचा |
अधिकृत वेबसाईट | वेबसाईटला भेट द्या |
SSC MTS Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
मल्टी टास्किंग स्टाफ | 11994 |
हवालदार | 529 |

SSC MTS Exam Syllabus 2023 : अभ्यासक्रम

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)
नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा — Join Here —
व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.
Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
TMC Recruitment 2023 | टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहीर